महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्रातील कुस्तीपट्टूंच्या मानधनात मोठी वाढ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सामन्यावेळी ब्रीजभूषण सिंह यांनी खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला कुस्तीत ऑलिम्पिक मेडल पटकावणारा मल्ल मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना विनंती केली होती की महाराष्ट्राच्या सरकारने मिशन ऑलिम्पिकच्या नावाने राज्यातील खेळाडूंना मदत करावी. महाराष्ट्राचा ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ संपावा. यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रात मिशन ऑलिम्पिक सुरू कऱण्यात येईल अशी घोषणा केली.

राज्यात ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धेत खेळणाऱ्यांना फक्त ६ हजार रुपये मानधन दिले जाते. पण ते मानधन २० हजार रुपये करण्याचा निर्णय आपण जाहीर करूया. महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद यांना ४ हजार रुपये दिले जातात. आता ते १५ हजार रुपये घोषित करुया. यासोबत अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडुंना ६ हजार रुपये दिले जातात. त्यांनाही २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार रुपये दिले जातात त्यांनाही तीनपट म्हणजेच साडे सात हजार रुपये देण्याचा निर्णय आज या निमित्ताने करत आहे. यामागे भावना हीच आहे की कुस्तीत मेहनत आणि खुराकही लागतो. या दोन्हीसाठी मोठा खर्चही होतो. सामान्य घरचे लोक मेहनतीने कुस्तीगीर होतात. त्यांना सरकारकडून मदत मिळायला हवी. त्यासाठी मानधनवाढीचा निर्णय घेतला आहे. तीन खेळाडूंना आपण थेट डीवायएसपीची नोकरी आपण दिली होती. अशी संधी खेळाडूंना देण्याचे काम निश्चितपणे करू असे याठिकाणी सांगतो असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.





  Print






News - Rajy




Related Photos