सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळवाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही येथे रुग्णांना फळवाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. समाजाप्रती संवेदनशीलता जपत गरजू रुग्णांना आधार देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंदेवाही तालुका अध्यक्ष दामोधर नन्नावार यांच्या प्रमुख उपस्थितीत फळवाटप करण्यात आले. तसेच चंद्रभूषण जैस्वाल, प्रकाश बन्सोड, अंबादास कोसे नागराज मेश्राम, ज्ञानेश्वर हांडेकर, आरिफ शेख, विजय जांभुळे, स्वप्नील कारमेंघे, सुमेश नागदेवते, जगदीश मेश्राम, मनोज गरमळे, अजय लोणबले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले.
News - Chandrapur




Petrol Price




