महत्वाच्या बातम्या

 माय युवा भारत पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपगूर : माय युवा भारत पोर्टल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयोगी असून त्यावर खेळाविषयी तसेच करिअरविषयी सखोल माहिती उपलब्ध असते.

युवक-युवतींनी या पोर्टलवर १५ ऑगस्टपर्यंत जास्तीतजास्त संख्येनी नोदणी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी  केले.

युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या मेरा युवा भारत कार्यालयाच्या विविध विषयांबाबत निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

यावेळी माय युवा भारतचे उपसंचालक सौरभ निषाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विनोद खेडकर व जिल्हा सल्लागार समिती सदस्यचे उपस्थित होते.

नागपुर विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालतील विद्यार्थींना माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्याच्या सूचना राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विनोद खेडकर यांनी देण्यात आल्या.

जिल्ह्यात नशा मुक्त अभियान कार्यक्रम लवकरच पोलीस विभागाच्या समन्वयातून राबविण्यात येणार असल्याचे उपस्थित सदस्याना सांगण्यात  आले.





  Print






News - Nagpur




Related Photos