महत्वाच्या बातम्या

 शेतात काम करताना वीजवाहिनीचा स्पर्श : मजुराचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शेतात काम करत असताना धुऱ्यावरून गेलेल्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने एका शेतमजुराचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोरी शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृताचे नाव प्रशांत नारायण लाडेकर  ४० वर्षे रा. बोरी असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत लाडेकर हे नेहमीप्रमाणे बोरी शिवारातील शेतात मजुरीचे काम करत होते. काम सुरू असताना शेताच्या धुऱ्यावरून गेलेल्या वीजवाहिनीचा त्यांच्या शरीराला स्पर्श झाला. त्यांना जोरदार विजेचा धक्का बसल्याने ते जागीच कोसळले. परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे बोरी गावात शोककळा पसरली असून, लाडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतातील धुऱ्यांवरून जाणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.





  Print






News - Wardha




Related Photos