महत्वाच्या बातम्या

 बुटीबोरी येथे २९ जूनला रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करीअर सेंटर व एजुस्पार्क, बुटीबोरी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, प्लॉट क्र. ए.एम १०१ (भाग) ईएसआयसी हॉस्पिटलसमोर, टेंभरी, बुटीबोरी, औद्योगिक क्षेत्र, नागपूर येथे करण्यात आले आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील उन्नती व्हेईकल प्रा. लि., एमपीएम प्रायव्हेट लिमिटेड, डस्ट ब्लोअर्स फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि., द युनिव्हर्सल ग्रुप ऑफ असोसिएट्स,अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, आर.सी. प्लास्टो टँक्स अँड पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड, वैभव एंटरप्रायझेस प्रा. लि., एसबीआय लाईफ, आशापुरा ॲग्रो इंडस्ट्रीज, सनविजय रोलिंग अँड इंजिनिअरिंग लिमिटेड इत्यादी कंपनीचा सहभाग राहणार असून त्यामध्ये दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा इत्यादी पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाणार आहे. याव्दारे जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.

सोबतच कार्यालयाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत देखील अंतिम वर्षातील (Last Year) मुलांना देखील प्रशिक्षणाच्या (इंटर्नशिप) संधी उपलब्ध होणार आहेत. सदर रोजगार मेळाव्यास जास्तीतजास्त उमेदवारांनी उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos