महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा तीव्र निषेध, आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी येथे एका अल्पवयीन चिमुरडीवर झालेल्या अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण चामोर्शी तालुक्यातून प्रचंड जनआक्रोश निर्माण झाला आहे. या अमानुष कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी चामोर्शीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत एक ऐतिहासिक मूक मोर्चा काढण्यात आला.

या घटनेने संपूर्ण गडचिरोली जिल्हा हादरून गेला असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटना, महिला मंडळे आणि हजारो तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले. नराधम आरोपीला कोणत्याही परिस्थितीत माफी मिळता कामा नये आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी एकमुखी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

या संवेदनशील पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.प्रशासनाला आणि सरकारला इशारा देताना संतोष ताटीकोंडावार म्हणाले, चामोर्शीत घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय आणि मानवतेला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अशा विकृत नराधमाला समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. कायद्याने अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन केले पाहिजे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court) चालवून नराधम आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणाचीही अशी क्रूर कृत्य करण्याची हिंमत होणार नाही. पीडित चिमुरडीला आणि तिच्या कुटुंबाला संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आमचा हा संघर्ष आणि जनआक्रोश थांबणार नाही.

संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रमुख मागण्या -

१. संबंधित नराधम आरोपीवर अत्यंत कडक कलमांखाली गुन्हा दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा.

२. पीडितेला कायदेशीर व वैद्यकीय मदत जलद गतीने उपलब्ध करून देऊन, आरोपीला थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी.

३. पीडित कुटुंबाला शासनाकडून आर्थिक आणि मानसिक पाठबळ तात्काळ पुरवण्यात यावे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos