वर्ध्यात रेल्वेच्या धडकेत ३६ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : येथील चितोडा रेल्वे ट्रॅकवर रेल्वेची जोरदार धडक लागल्याने एका ३६ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उज्ज्वला लोंढे असे मृत महिलेचे नाव -
प्राप्त माहितीनुसार, उज्ज्वला लोंढे ३६ वर्ष, राहणार - अशोकनगर, वर्धा असे रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या चितोडा रेल्वे लाईन परिसराच्या ट्रॅकवरून जात असताना धावत्या रेल्वेची त्यांना भीषण धडक बसली. रेल्वेचा फटका इतका जोरात होता की, गंभीर दुखापत झाल्याने उज्ज्वला यांचा जागीच प्राणांत झाला.
रेल्वे रुळाशेजारी आढळला मृतदेह -
अपघातानंतर त्या रेल्वे रुळाच्या कडेला मृतावस्थेत पडून असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
शहर पोलिसांत नोंद; तपास सुरू -
वर्धा शहर पोलिसांनी या घटनेची रीतसर नोंद घेतली असून, मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवला आहे. उज्ज्वला लोंढे या रेल्वे ट्रॅकवर नेमक्या कशासाठी गेल्या होत्या आणि हा अपघात कसा घडला, याचा पुढील सखोल तपास शहर पोलीस करत आहेत.
News - Wardha




Petrol Price




