महत्वाच्या बातम्या

 कुरखेडा-वाकडी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक : गोठणगाव येथील तरुण जागीच ठार, एक गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : कुरखेडा-वाकडी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना घडताच परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

धर्मराज बोदेले यांचा जागीच मृत्यू -
प्राप्त माहितीनुसार, धर्मराज तुळशीराम बोदेल ३७ वर्ष, राहणार - गोठणगाव, ता. कुरखेडा असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. धर्मराज हे आपल्या दुचाकीने जात असताना कुरखेडा ते वाकडी मार्गावर समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची आणि त्यांच्या वाहनाची समोरासमोर अत्यंत भीषण धडक झाली. या धडकेत धर्मराज यांना गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी -
या अपघातामध्ये दुसऱ्या दुचाकीवरील चालकही गंभीररीत्या जखमी झाला आहे. अपघाताच्या प्रभावामुळे त्याच्या शरीरावर आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सद्यस्थितीत जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांची मदतीसाठी धाव -
अपघाताचा भीषण आवाज होताच मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमीला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. या घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे व पुढील तपास सुरू केला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos