महत्वाच्या बातम्या

 डॉ. ए. व्ही. एस. शर्मा यांना कॉम्पॅक्ट रिअ‍ॅक्टर व्हेसल डिझाइनसाठी राष्ट्रीय पेटंट मंजूर


- गडचिरोलीतील प्रसिद्ध रसायनशास्त्र शिक्षकांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; तिसरे पेटंट मिळवण्याचा मान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरातील प्रसिद्ध रसायनशास्त्र शिक्षक तथा संशोधक डॉ. ए. व्ही. एस. शर्मा यांना त्यांच्या नावावर आणखी एक राष्ट्रीय पेटंट मंजूर झाले आहे. Compact Reactor Vessel for Ionic Liquid Preparation and Characterization या नावीन्यपूर्ण डिझाइनसाठी त्यांना हे पेटंट प्राप्त झाले असून, त्यांच्या संशोधन क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नॉव्हेल आयोनिक लिक्विड (Novel Ionic Liquid) यांना आगामी काळात मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. विविध औद्योगिक, वैज्ञानिक आणि जनहिताच्या क्षेत्रात त्यांचा उपयोग वाढण्याची शक्यता आहे. या आयोनिक लिक्विडची निर्मिती तसेच त्यांचे अचूक विश्लेषण (Characterization) करण्यासाठी विकसित करण्यात आलेले कॉम्पॅक्ट रिअ‍ॅक्टर व्हेसल हे संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

डॉ. ए. व्ही. एस. शर्मा यांनी Synthesis and Characterization of Novel Ionic Liquid या विषयावर पीएच.डी. केली असून, त्यांनी आयोनिक लिक्विडच्या निर्मिती व गुणधर्मांचा सखोल अभ्यास केला आहे. याच संशोधनाच्या पुढील टप्प्यात त्यांनी विकसित केलेल्या या डिझाइनला पेटंटच्या माध्यमातून मान्यता मिळाली आहे.

डॉ. शर्मा यांना मिळालेले हे तिसरे पेटंट असून, त्यांच्या सातत्यपूर्ण संशोधन वृत्तीचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे हे फलित मानले जात आहे. शिक्षण क्षेत्रासोबतच संशोधन क्षेत्रातही त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रात मानाचा ठसा उमटवला आहे.

या यशाबद्दल डॉ. ए. व्ही. एस. शर्मा यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या संशोधन कार्यामुळे भविष्यात विज्ञान क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos