महत्वाच्या बातम्या

 तीर्थ दर्शनसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन


- ११ जुलै रोजी नागपूर येथून होणार यात्रेचा शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / वर्धा : महाबोधी  मंदिर गया या तीर्थ क्षेत्राकरीता पात्र १५० लाभार्थ्यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली आहे.  निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यात्रेचा शुभारंभ नागपूर येथून ११ जुलै रोजी होणार आहे. यासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी नागपूर येथील मुख्य रेल्वे स्टेशनवर सकाळी ८ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मन:शांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्राना मोफत भेटीचे दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत महाबोधी  मंदिर गया या तीर्थक्षेत्राकरीता जिल्‍ह्यातील पात्र १५० लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांसाठी ११ ते १६ जुलै या कालावधीत यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. सदर यात्रा प्रवास नागपूर येथून विशेष रेल्वेने  सुरु होणार आहे.

निवड झालेल्या लाभार्थ्यांनी यात्रेस जाण्याकरीता ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत नागपूर येथे वैद्यकीय प्रमाणपत्रासह हजर राहावे. यासाठी वर्धा ते नागपूर येथे जाण्याकरीता महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची विशेष बस सकाळी ६ वाजता पासून सोडण्यात येणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी स्वखर्चाने नागपूर रेल्वे स्टेशन येथे हजर राहावे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos