महत्वाच्या बातम्या

 चामोर्शीत नगरपंचायतीजवळ दोन भावांची दुकाने फुटली : २५ हजारांचा माल लंपास


- चामोर्शी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल : व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / चामोर्शी : येथील नगरपंचायतीजवळ भरवस्तीत असलेल्या दोन सख्ख्या भावांची दुकाने अज्ञात चोरट्याने फोडून एकूण २५ हजार ३५५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २५ जून रोजी चामोर्शी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान वॉर्डातील रहिवासी फिर्यादी दुर्गादास परमानंद गुरनानी यांचे नगरपंचायतीजवळ इलेक्ट्रिकल्सचे दुकान आहे. त्यांच्या या दुकानाच्या शेजारीच त्यांच्या मोठ्या भावाचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे.

चोरट्याने या दोन्ही दुकानांना आपले लक्ष्य केले. रात्रीच्या सुमारास दुकानांचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला आणि दोन्ही दुकानांमधून एकूण २५ हजार ३५५ रुपयांचा माल लंपास केला.

सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दुर्गादास गुरनानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos