महत्वाच्या बातम्या

 ओडिशातून मुंबईकडे ट्रकने १९९ किलो गांजाची तस्करी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : ओडिशा राज्यातून १९९ किलोग्रॅम गांजा घेऊन नागपूर, अमरावतीमार्गे मुंबईकडे निघालेला ट्रक पोलिसांनी गोपनीय माहितीवरून सेंदूरवाफा टोलनाक्यावर मध्यरात्री पकडला. या ट्रकमधून १९९.५६० किलो गांजा जप्त करण्यात आला.

१ कोटी ३४ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची ही मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. २६ ते २७ जुलैच्या मध्यरात्री १२:४९ वाजता ही कारवाई करण्यात आली. गांजा घेऊन डब्ल्यूबी २३ एफ ८७८५ क्रमांकाचा ट्रक रायपूर-राजनांदगाव- देवरी-साकोली राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरकडे जात असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.

रचण्यात टोलनाक्यावर हे वाहन पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ट्रकमध्ये लपवून ठेवलेला १९९.५६० किलो गांजा आढळून आला. गांजाची किंमत ९९ लाख ७८ हजार असून ट्रकची किंमत ३५ लाख आहे. त्यावरून टोलनाक्यावर सापळा सेंदूरवाफा आला.

पोहचताच अडवून चतुराईने लपविला होता गांजा गांजा चुंगड्यांमध्ये लपविण्यात आला होता. वर केबलचे बंडल ठेवून त्याखाली गांजाच्या बांधलेल्या पिशव्या होत्या. ट्रक अडविल्यावर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांची बतावणी फार काळ टिकू शकली नाही. 

या मोहीमेचे संपूर्ण श्रेय पोलिसांना आणि सूजाण नागरिकांना आहे. जागर नशामुक्ती अभियान १.० या उपक्रमाचे हे फलित आहे. तस्रांविरोधात सुरू असलेल्या कारवाया आणि मोहीम अधिक तीव्र केल्या जातील. नशामुक्त समाजनिर्मितीसाठी आम्ही सदैव योगदान देत राहू. नूरुल हसन, पोलिस अधीक्षक, भंडारा मुळापर्यंत जाणार या कारवाईत ट्रक चालक पंकजकुमार भूषण यादव ३०, खुजहटिता, मांजी, बिहार तसेच क्लीनर बापी बादल मालीक ३८, नवग्राम, पश्चिम बंगाल यांना ताब्यात घेण्यात आले. 

बापी हा वाहनमालक आणि क्लिनरदेखील आहे. गांजाची तस्करी ते नियमित करायचे का, कोणासाठी हा माल पोहचवायचे, हे रॅकेट कुणाच्या इशाऱ्यावर चालायाचे, याचा तपास घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

गोपनीय माहितीवरुन पोलिसांची कारवाई बिहार व पश्चिम बंगालमधील दोघे ताब्यात उपविभागीय अधिकाऱ्यांना ३.५० लाखांचे विशेष रिवॉर्ड ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी साकोली उपविभागीय अधिकारी कार्यालयाला ३ लाख ५० हजार रुपयांचे विशेष रिवॉर्ड जाहीर केले. कारवाईनंतर नूरुल हसन यांनी साकोली पोलिस ठाण्यास भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन कौतक केले.





  Print






News - Bhandara




Related Photos