गुरांच्या मागे धावताना पाय घसरल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : तालुक्यातील परसलगोंदी येथे गुरांच्या मागे धावत असताना पाय घसरून पडल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २२ जुलै रोजी घडली. या घटनेमुळे परसलगोंदी गावात शोककळा पसरली आहे.
मादी राजू नरोटी ६५ वर्षे रा. परसलगोंदी, ता. एटापल्ली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेती व्यवसाय करत असून, २२ जुलै रोजी नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी शेतात घेऊन गेले होते. दरम्यान, गुरांच्या मागे धावत असताना त्यांचा पाय घसरून ते जोरात जमिनीवर पडले.
सायंकाळच्या सुमारास गावातील एका व्यक्तीला नरोटी हे शेतात बेशुद्धावस्थेत पडलेले दिसून आले. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. नरोटी यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




