भूयार येथे भीषण अपघात : ट्रकच्या धडकेत ६१ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / भूयार (पवनी) : पवनी तालुक्यातील भूयार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर नागभिड रोडवर एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२३ जून) सकाळी सुमारास घडली.
सुमन फत्रु दुधकुरे (६१, रा. भूयार, ता. पवनी) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुमन दुधकुरे या मोटारसायकलने प्रवास करत असताना, भूयार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील नागभिड रस्त्यावर एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, सुमन दुधकुरे या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
News - Bhandara




Petrol Price




