महत्वाच्या बातम्या

 कुंदन खोब्रागडे यांचे ICMR मधील ब्लॉक प्लेसमेंट यशस्वीरीत्या पूर्ण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : नवरगाव येथून जवळच असलेल्या गिरगांव येथील सर्वसाधारण कुटुंबातील होतकरू विद्यार्थी कुंदन सतीश खोब्रागडे यांचे समाजकार्यातील पदवूत्तर अभ्यासक्रम MSW हे स्व. सुशीला रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथे वैद्यकीय आणि मन:चिकित्सक समाजकार्य या विशेषिकरणात सुरू आहे. याच अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ब्लॉक प्लेसमेंट करिता कुंदन यांची चंद्रपूर आय.सी.एम.आर. (ICMR) सिकलसेल संशोधन विभागातील ब्लॉक प्लेसमेंटकरिता १८ मे २०२६ रोजी निवड झाली होती. 

हे प्रशिक्षण १८ मे २०२६ ते १७ जून २०२६ या कालावधीत एकूण ३० दिवस चालले. १७ जून २०२६ रोजी त्यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कालावधीत कुंदन यांनी आय.सी.एम.आर. मधील समाजकार्यकर्त्याची भूमिका व जबाबदाऱ्या प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेतल्या. तसेच ग्रामीण व शहरी भागात क्षेत्रकार्य (Field Work) करत सिकलसेल आजाराबाबत जनजागृती मोहिमा राबवल्या.

रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी सिकलसेल रुग्णांचा अभ्यास, त्यांच्या समस्या व गरजा जाणून घेतल्या. याशिवाय त्यांनी सिकलसेल आजाराचे नियंत्रण, निदान प्रक्रिया, उपचारपद्धती, तसेच आरोग्यविषयक सल्लामसलत या बाबींमध्ये महत्त्वपूर्ण ज्ञान मिळवले. या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या सादरीकरण कौशल्यांमध्ये (Presentation Skills) देखील लक्षणीय वाढ झाली. 

कुंदन खोब्रागडे यांच्या या यशस्वी ब्लॉक प्लेसमेंटमुळे त्यांना वैद्यकीय समाजकार्य क्षेत्रात व्यावहारिक अनुभव मिळाला असून, भविष्यात समाजसेवेच्या कार्यात अधिक प्रभावीपणे योगदान देण्यासाठी हा अनुभव निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापक वृंद आणि सर्वांकडून कौतुक होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos