चंद्रपूर जिल्हा माहेश्वरी सभेची नवीन कार्यकारिणी जाहीर : अजय काबरा जिल्हाध्यक्ष तर राजेश कांकाणी सचिवपदी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीची घोषणा महेश भवन येथे आयोजित सभेत करण्यात आली. समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन केले.
नवीन कार्यकारिणीत अजय रमेशचंद्रजी काबरा (नागभीड) यांची जिल्हाध्यक्षपदी तर राजेश श्यामसुंदरजी कांकाणी यांची सचिवपदी निवड करण्यात आली. तसेच श्रीकांत मुंदडा (वरोरा) व मनीष मालू (बल्लारशाह) यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.नारायण तोषणीवाल यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून गोपाल गंगाबीसनजी मुंदडा यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारिणीत मनोहर कलंत्री (ब्रह्मपुरी) यांची सहसचिवपदी, प्रभाकर मंत्री यांची संघटन मंत्रीपदी, अनिल राठी यांची प्रसिद्धी मंत्रीपदी तर कमलकिशोर बजाज (राजुरा) व हिरालाल बलदवा (चिमूर) यांची संयुक्त मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटीभाऊ भांगडिया, विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष सीए दामोदर सारडा तसेच निवर्तमान अध्यक्ष शिव सारडा यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
माजी पदाधिकारी डॉ. सुशील मुंदडा, डॉ. जुगलकिशोर सोमाणी,उमेश चांडक, दिनेश बजाज, विनोद मेहता, मनमोहन कलंत्री, विजय काबरा, अजय भट्टड तसेच विद्यमान तहसील अध्यक्ष संदीप माहेश्वरी आणि तहसील सचिव हनुमान बजाज यांनीही नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन संघटनेला नवीन उंचीवर नेण्याचा विश्वास व्यक्त केला.
निवडणूक अधिकारी म्हणून सुधीर श्यामलालजी बजाज यांनी तर सहनिवडणूक अधिकारी म्हणून भरत चंद्रकांत बजाज यांनी जबाबदारी पार पाडली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीने समाजातील एकता बळकट करणे, सामाजिक विकासाला गती देणे, युवकांचा सहभाग वाढविणे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
समाजातील सर्व बंधू-भगिनींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी व उज्ज्वल कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
News - Chandrapur




Petrol Price




