महत्वाच्या बातम्या

 डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त भाजपचे कार्यकर्ता संमेलन व BLA-२ कार्यशाळा उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सुमानंद सभागृह येथे कार्यकर्ता संमेलन तसेच BLA-२ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात विशेष गहन पुनरावृत्ती मतदार नोंदणी (SIR) अभियानाबाबत विदर्भ समन्वयक अमेय बावणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी मतदार नोंदणी प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी बूथस्तरावरील कार्यकर्त्यांची भूमिका, अभियानाची उद्दिष्टे आणि अंमलबजावणीबाबत आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे यांच्यासह पक्षाच्या विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, बूथ प्रमुख, BLA-२ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमातून आगामी काळातील संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्याबरोबरच विशेष गहन पुनरावृत्ती मतदार नोंदणी (SIR) अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos