महत्वाच्या बातम्या

 रत्नापुरात तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व नवनिर्मित विहाराचे लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर बौध्द समाज, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन व श्रावस्ती महिला मंडळाच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या पूर्णाकृती मूर्तीची प्रतिष्ठापना व नवनिर्मित विहाराचे लोकार्पण  शुक्रवारी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात  बुद्ध इंटरनॅशनल मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष भदंत डॉ. बुद्धरत्न संबोधी महाथेरो (कामठी) यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केले आणि त्यानंतर विधीवत पूजापाठ करून बुद्ध मूर्ती व विहाराचे लोकार्पण केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला- भारतीय घटनेची शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांनापूज्यनिय, डॉ, बुद्धरत्न संबोधी महाथेरो यांनी माल्यार्पण, दीपप्रज्वलन करून उपस्थित बौद्ध समाजाला- त्रि-शरण- पंचशील-देऊन परित्राण पाठाद्वारे--धम्मदेसना देऊन आदर्श बुद्ध समाज कसा निर्माण होईल---? यावर प्रवचन केले.

सायंकाळी गावातून तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. निळ्या ध्वजांनी सजलेली ही मिरवणूक  गावातील मुख्य मार्गावरून जात असताना गावकऱ्यांनी  दर्शन घेतले. मिरवणूक कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर सायंकाळी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध समाजाचे अध्यक्ष गजानन मेश्राम, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. संजय बोधे वरोरा, गुलाबराव गणवीर चिमूर, धम्मभूमी विकास सेवा समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच सदाशिवराव मेश्राम, मंगेश मेश्राम, वनिता मेश्राम, बार्टीच्या समतादूत कृपाली धारणे, धनोज खोब्रागडे, नोमेश मेश्राम उपस्थित होते. 

प्रास्ताविक मंगेश मेश्राम, संचालन धीरज मेश्राम, तर आभार गजानन मेश्राम यांनी मानले.कार्यक्रमा नंतर सर्व बांधवाना भोजनदान देण्यात आले,,ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रत्नापुर येथील श्रावस्ती महिला मंडळ आणि बौद्ध समाज, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन यांनी सहकार्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos