आजचे दिनविशेष


१३ एप्रिल महत्वाच्या घटना
१६९९ : गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
१७३१ : छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
१८४९ : हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.
१९१९ : जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
१९४२ : व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
१९६० : अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
१९९७ : मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.
२०२४ : इराण-इस्रायल युद्ध - इराणने इस्रायल देशावर ४०० ते ५०० ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे इराण, इराक, सीरिया, दक्षिण लेबनॉन आणि येमेन या प्रांतातून प्रक्षेपित केली.
२०२२ : कोविड-१९ - जगभरात ५० करोड पेक्षा अधिक लोकाना कोरोना साठीची लागण.
१३ एप्रिल जन्म
१७४३ : अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)
१८९५ : भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९७८)
१९०५ : इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचा जन्म.
१९०६ : आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म.
१९२२ : टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९९)
१९४० : राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला यांचा जन्म.
१९५६ : अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म.
१९६३ : रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारॉव्ह यांचा जन्म.
१९७१ : भारतीय फुटबॉल खेळाडू कार्ल्टन चॅपमन याचं जन्म (मृत्यू : १२ ऑक्टोबर २०२०)
१९४३ : भारतीय लिंबू भाषेतील लेखक - पद्मश्री बिरखा बहादूर मुरिंगला यांचा जन्म (मृत्यू : ८ जून २०२२)
१८९० : मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचा जन्म (मृत्यू : १९ जानेवारी १९६०)
१८८२ : अमेरिकन चित्रपट निर्माते, क्रिस्टी फिल्म कंपनीचे संस्थापक चार्ल्स क्रिस्टी यांचा जन्म (मृत्यू : १ ऑक्टोबर १९५५)
१८७५ : पहिला बॅरन थॉमसन, भारतीय-इंग्रजी सैनिक आणि राजकारणी ख्रिस्तोफर थॉमसन यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑक्टोबर १९३०)
१८०८ : आवाजाने संवाद करणारे उपकरण, टेलिफोनचे पहिले शोधक अँटोनियो म्यूची यांचा जन्म (मृत्यू : १८ ऑक्टोबर १८८९)
१७३२ : इंग्रजी राजकारणी, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान फ्रेडरिक नॉर्थ, लॉर्ड नॉर्थ यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट १७९२)
१३ एप्रिल मृत्यू
१९५१ : औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८६८)
१९७३ : अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन. (जन्म: १ मे १९१३)
१९७३ : भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८९५)
१९८८ : महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.
१९९९ : कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.
२००० : चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.
२००८ : संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३० – बडोदा, गुजराथ)
२००५ : सर्बिया देशाचे १०वे अध्यक्ष, जनरल आणि राजकारणी निकोला ल्युबिसिक यांचे निधन (जन्म: ४ एप्रिल १९१६)
१९९० : भारतीय अभिनेते, गायक आणि वीणा वादक एस. बालचंदर याचे निधन (जन्म: १८ जानेवारी १९२७)
१९६३ : भारतीय तत्त्वज्ञ आणि लेखक बाबू गुलाबराय यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १८८८)
News - todayspecialdays




Petrol Price




