१६ व १७ एप्रिल रोजी निवड चाचणी आयोजन : निवड चाचणीमध्ये सहभाग घ्यावा जिल्हा क्रीडा यांचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत मिशन लक्ष्यवेध योजना कार्यन्वित करण्यात येत आहे. मिशन लक्ष्यवेध योजना या माध्यमातून ऑलम्पीक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या १२ खेळा प्रकारामध्ये लक्ष केंद्रीत करण्याचे महाराष्ट्र शासनाचे मानस आहे. सदरची योजना हि त्रिस्तरीय असुन राज्यस्तरावर हाय परफॉमन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट एक्सलन्स सेंटर व जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र राबविण्यात येणार आहे.
मिशन लक्ष्यवेध योजनेतुन भंडारा जिल्हयामध्ये क्रीडा प्रतिमा विकास केंद्रामार्फत अॅथलेटिक्स व रोईंग असे एकुण ०२ क्रीडा प्रकारामधुन प्रत्येकी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिमा विकास केंद्र या माध्यमातुन मैदानी व रोईंग या खेळाकरीता निवड चाचणीचे आयोजन करणे प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील पात्र व गुणवत्ता खेळाडुना संबंधीत खेळामध्ये प्रगत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने हि केंद्रे कार्यान्चित करण्यात येणार आहेत.
पात्रतेचे निकर्ष पुढीलप्रमाणे आहे. खेळाडूची वयोमर्यादा २१ वर्षाआलीत मुले/मुली त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी असावी, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (असल्यास), वैद्यकीय तपासणी शासन मान्यताम्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत ०२ यांतील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज ०३ फोटोग्राफ, शाळा महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणापत्र, पालकांचे संमतीपत्र इ लावणे आवश्यक आहे. क्रीडा स्पर्धेतील किमान कामगिरी राज्यस्तरावरील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू. (शालेय / संघटना अधिकृत स्पर्धा) गत २ वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक राहील. उपरोक्त निकर्ष पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची निवड तज्ञ संमितीव्दारे करण्यात येणार असून हे प्रक्रीया अनिवासी राहिल, त्यांचा पुरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, राष्ट्रीय व विदेशी स्पर्धा प्रवास खर्च, प्रशिक्षक / मार्गदर्शक, वैद्यकीय उपचार, विमा आणि प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सदर योजनेतर्गत केला जाणार आहे.
चाचणीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. मैदानी खेळाकरिता निवड चाचणी १६ एप्रिल २०२६ या कालावधीत चैतन्य पोलीस मैदान, भंडारा व रोईंग या खेळाकरिता निवड चाचणी १७ एप्रिल २०२६ या कालावधीत जलक्रीका केंद्र वैनगंगा नदी कारधा येथे पार पडणार आहे. निवड चाचणी आयोजन समिती प्रमुख अविनाश निबातें क्रीडा मार्गदर्शक, भंडारा, मो. ७५०७४९३०९४ प्रतिक लाडे, क्रीडा मार्गदर्शक ९५९५३०११८४ असतील.
करीता पात्र सखेळाडूंनी आपले अर्ज संपूर्ण माहितीसह विहित नमुन्यात ऑफलाईन स्वरुपात निवड चाचणीवेळी सादर करावयाचे आहे. सदर जिल्हास्तर निवड चाचणी करीता जास्तीत जास्त खेळाडूंनी सदर निवड चाचणीमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन, लतिका लेकुरवाळे, जिल्हा क्रीडा भंडारा विभागानी कळविले आहे.
News - Bhandara




Petrol Price




