महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत सहकारी संस्थांतील पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पूणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा सहकारी बोर्ड लि. गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी सहकारी व पगारदार सहकारी संस्थांतील पदाधिकारी, संचालक आणि सेवकांसाठी दोन दिवसीय शिक्षण व प्रशिक्षण वर्ग २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था मर्या. गडचिरोलीच्या सभागृहात आयोजित केला गेला.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमोद पिपरे, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पूणे होते. उद्घाटन हेमंत सौलाखे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था गडचिरोली यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी घनश्यामजी मडावी, अध्यक्ष, देसाईगंज नागरी सहकारी बँक मर्या., तसेच प्रमुख मार्गदर्शक  प्रशांतजी शिर्के (अॅड.), पी.व्ही. तलमले, जिल्हा सहकार विकास अधिकारी, आणि प्रशांत शिंदे, प्रमाणित लेखापरीक्षक, चंद्रपूर उपस्थित होते.

या प्रसंगी प्रमोद पिपरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पूणे सहकार क्षेत्राच्या विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि प्रचार प्रसार महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या संघाच्या माध्यमातून १३ जुलै १९१८ पासून सतत करत आहे. त्यांनी म्हटले की, सहकारी कायद्यातील नविन बदलांनुसार संस्थेतील सर्व घटकांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे, ज्यामुळे संचालक, पदाधिकारी व सभासद कार्यक्षमतेने आपले कर्तव्य पार पाडू शकतील.

या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक प्रमोद पिपरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच अ. कावळे सहकार अधिकारी, तृप्ती रितेश भोवरे (सहकार अधिकारी श्रेणी-१), सोमनकर अध्यक्ष संताजी (नागरी सहकारी पतसंस्था, गडचिरोली) आणि तालुक्यातील व शहरातील नागरी व पगारदार सहकारी संस्थांतील पदाधिकारी, संचालक व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आणि श्रीकृष्ण अर्जुनकर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos