महत्वाच्या बातम्या

 पक्षाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडा : डॉ. कोठेकरांचा डॉ. होळींना संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नागपूर येथील पक्ष कार्यालयात भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांची माजी आमदार तसेच भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत विविध संघटनात्मक व राजकीय विषयांवर चर्चा केली. यावेळी डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांनी डॉ. देवराव होळी यांना मार्गदर्शन करत पक्षाने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे सांगितले.

आदिवासी समाजामध्ये पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण तयारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना जोडून संघटन विस्तारासाठी प्रयत्न करण्याचा मोलाचा संदेशही त्यांनी दिला.

या प्रसंगी आगामी काळातील पक्षाच्या संघटनात्मक रणनीतीवरही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.





  Print






News - Nagpur




Related Photos