गडचिरोलीत ट्रकचा भीषण अपघात : मेंढ्यांच्या कळपावर धडक, २३ ठार, २७ जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : मूल मागांवरील पारडी जवळील वैनगंगा पुलावर गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारा अपघात घडला. भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्यामुळे २३ शेळ्या-मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर २७ शेळ्या-मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या घटनेत आपल्या पशूंना वाचवण्याचा प्रयत्न करत मेंढपाळही जखमी झाला असून, त्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची परिस्थिती -
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल बिरा पेहीवार यांच्या मालकीच्या मोठ्या मेंढ्यांच्या कळपाला गडचिरोलीहून व्याहाडच्या दिशेने नेले जात होते. त्याचवेळी मुलकडे जाणाऱ्या ट्रकने कळपाला भीषण धडक दिली. ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट मेंढ्यांच्या कळपात शिरले.
पोलीस कारवाई -
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य राबवून मृत मेंढ्यांना रस्त्यावरून हलवले व वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, वाहन जप्त केले आहे.
तपास सुरु -
या अपघाताचा पुढील तपास गडचिरोली पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भास्कर ठाकर करत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




