महत्वाच्या बातम्या

 आष्टी पोलिसांची धडक कारवाई : ३.४४ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त; आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी : आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक करून पोलिसांनी ३ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अपराध क्रमांक ५३/२०२६ अंतर्गत कलम ६५(अ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी झाली कारवाई -
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.१० ते ३.०० वाजताच्या सुमारास मौजा आष्टी, कोहळे पेट्रोल पंप समोर संजय पंदीलवार यांच्या लेआऊटजवळ, आष्टी-आलापल्ली मार्गावर (सुमारे १ कि.मी. पूर्व) ही कारवाई करण्यात आली.

मुखबिराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर व्ही.एक्स.आय. (क्रमांक एमएच ४७ के ९९६१) ही चारचाकी गाडी अडवली. दोन प्रतिष्ठित पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली असता आरोपी सुनीलसिंग प्रतापसिंग बैस (वय ४९ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. बाजार वार्ड, कन्यका मंदिर, चंद्रपूर) याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू आढळून आली.

जप्त मुद्देमाल -
झडतीदरम्यान खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला : १५ खाकी बॉक्समध्ये एकूण १५०० नग रॉकेट देशी दारू संत्रा (९० एमएल प्लास्टिक सिलबंद निपा) - अंदाजे किंमत ₹१,२०,०००, ५ खाकी बॉक्समध्ये एकूण १२० नग हायवर्ड ५००० प्रीमियम स्ट्रॉंग बिअर (५०० एमएल टिन बॉटल) - अंदाजे किंमत ₹२४,०००, एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर चारचाकी - अंदाजे किंमत ₹२,००,००० अशा प्रकारे एकूण ₹३,४४,००० किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

आरोपी अटकेत; पुढील तपास सुरू -
सदर दारू बिनापरवाना व अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोकुलदास मेश्राम करीत आहेत.

ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अमलदार पोहवा/२३४६ रतन रॉय यांनी पार पाडली. अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे आष्टी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos