ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उद्घाटन तथा कार्यकारिणी घोषित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी संस्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा गडचिरोली कार्यालयाचे उद्घाटन विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर यांचे हस्ते पार पडले. ग्राहक चळवळीला प्रोत्साहन देण्याकरिता, ग्राहकांच्या अडी अडचणींचा निपटारा करण्याकरिता तसेच ग्राहक हिताकरिता सक्रीय राहण्याचे आवाहन पात्रीकर यांनी केले.
सदर कार्यक्रमाला डॉ. कल्पना उपाध्याय, विदर्भ प्रात संघटिका, नितीनजी मुकेवार, निकेश्जी कावळे, परशुरामजी तुंडूलवार, देविदासजी नंदूरकर यांचे उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष संजय धकाते, सचिव प्रविण घाटे, संघटक अरुण मुनघाटे, विधी सल्लागार अॅड. संजय भट, कोषाध्यक्ष योगेश बाबनवाडे, सह संघटक प्रतिभा चौधरी, सहसचिव प्रभाकर बाबनवाडे, प्रसिध्दी प्रमुख संजय मेश्राम, तसेच सर्वश्री धनंजय पत्रे, हेमंत रामटेके, अविनाश उराडे, धर्मेंद्र मुनघाटे, मोहन इटनकर, अजय निबांळकर, निलिमा कोहाड यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
News - Gadchiroli




Petrol Price




