महत्वाच्या बातम्या

 कोरची - मोहगाव नजीक भीषण अपघात : दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी


- ट्रॅक्टरला सुसाट येणाऱ्या ट्रकने मागून दिली जोरदार धडक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालूका प्रतिनिधी / कोरची : कोरची वरून  २ किमी अंतरावरील मोहगाव जवळ कुरखेडा तालुक्याच्या चांदागड येथून एम. सत्यनारायण कंपनीच्या मृद व जलसंधारण विभागाकडून सुरु असलेल्या कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे बंधाराच्या कामानिमित्त लोखंडी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मोहगाव नजीक मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की जागीच एका कामगाराचा मृत्यू झाला. मयत झालेल्या कामगार सागर कल्लो २० वर्ष चांदागड तर दुसरा कामगार कैलास कोवे  ३५ वर्ष वाकडी यांचे रुग्णालयात घेऊन जाताना वाटेतच मृत्यू झाले. तर प्रदीप नैताम २४ वर्ष चीचटोला, राजेश गंगाभोईर वय २८ वर्ष चिंचगाव यांचा हात फॅक्चर झालेला असून,चालक पुरुषोत्तम मडकाम ५१ वर्ष गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती प्राप्त होतात १०८ रुग्णवाहिकेला दूरध्वनीद्वारे संपर्क करण्यात आले परंतु दोन तीनदा संपर्क करून सुद्धा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही यामुळे एका खाजगी वाहनाने पोलीस विभागाच्या मदतीने तातडीने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे अपघातग्रस्त रुग्णांना भरती करण्यात आले.

हैदराबाद येथून रायपूर कडे दगडांची चुरी घेऊन जाणारा ट्रक क्रमांक CG07BA९२८४ ट्रक चालक अभिषेक शर्मा उत्तरप्रदेश चितवाडा जिल्हा बालिया ३० वर्ष हा सुसाट पणे येत असताना कोरची मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर सदर अपघात घडला. 

अपघात झाल्यावर ट्रक चालक प्रसार होण्याचा प्रयत्न करीत असताना. पोलिसांनी लावलेल्या तपासणी नाक्यादरम्यान सदर ट्रकला अडवण्यात पोलिसांना यश आले असून अभिषेक शर्मा असे ट्रक चालकाचे नाव असून पुढील तपास कोरची पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.

जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos