महत्वाच्या बातम्या

 कुर्ली येथील आत्महत्या प्रकरणात अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक अँट्रोसिटी अँक्ट पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


- आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल - उप विभागीय पोलीस अधिकारी राॅबिन बन्सल

विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील यश उर्फ विकास दत्ता नगराळे (वय १७, रा. कुर्ली ता. घाटंजी) याने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी आई सतिका दत्ता नगराळे (वय ३७, रा. कुर्ली ता. घाटंजी) यांच्या जबानी रिपोर्ट वरुन पारवा पोलीस ठाण्यात अपराध क्रंमाक ६३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०७ आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम १९८९  अन्वये ३ (२) (va) अट्रोसिटी अँक्टचा गुन्हा पारवा पोलीस स्टेशन पोलीस हेड काॅ. देवानंद बन्सोड यांनी नोंदविला आहे. 

सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी राबिन बन्सल (ADDL DP & SDPO ROBIN BANSAL) करीत आहे. 

कुर्ली येथील मृतकाची आई सतिका दत्ता नगराळे यांनी पारवा पोलीस स्टेशनला दिलेल्या जबानी रिपोर्ट नुसार, मी समक्ष पोलीस स्टेशनला येवुन जबानी रिपोर्ट देते की, मी कुर्ली येथे वरील नमुद पत्त्यावर यश उर्फ विकास दत्ता नगराळे (वय १७) व आकाश दत्ता नगराळे (वय १०) असे दोन्ही मुलांसोबत कुर्ली येथे राहते. माझे पती दत्ता नगराळे हे वझरा (ता. किनवट जि. नांदेड) येथे राहतात व शेतीचे काम करतात. मी कुर्ली येथील ऋषिकेश तम्मेवार यांचे  ६ एकर शेत १ लाख रुपये मक्त्याने केले आहे. मी व माझा मुलगा यश उर्फ विकास नगराळे असे दोघेही त्या शेतात कपाशीचे / प-हाटीचे पिक पेरल्याने ऋषिकेश तम्मेवार यांच्या शेतात नेहमी जाणे - येणे करत असे.

आमचे कुर्ली (ता. घाटंजी) येथील मोहल्यात नसरीन उर्फ नसीम शब्बीर पठाण (वय ३५, रा. कुर्ली ता. घाटंजी) हे राहत असुन मागील ४ ते ५ महिण्यापासुन ती तिचे पती सोबत वेगळी राहत आहे. माझा मुलगा यश उर्फ विकास नगराळे हा मागील २ ते ३ महिण्यापासुन नसरीन उर्फ नसीम पठाण हिचे सोबत प्रेमसंबंध आहे, असे मला माहीत पडले. माझा मुलगा महार जातीचा व अल्पवयीन असल्याचे तिला माहीत होते तरीसुद्धा तिने यश सोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यावेळी मी माझा मुलगा यश उर्फ विकास नगराळे व नसरीन उर्फ नसीम शब्बीर पठाण हिला समजावुन सांगीतले होते की, माझा मुलगा यश हा लहान आहेस तु विवाहित असून तु वयाने खुप मोठी आहे. तु अशा भानगडीत पडू नको.

तसेच २२ नोव्हेंबर २०२५ रोजी नसरीन उर्फ नसीम पठाण ही माझे घरी मला भेटण्यासाठी आली असता, मी तिला सांगितले की, माझ्या मुलासोबत बोलु नको व विनाकारण त्रास देऊ नको, असे समजावुन सांगीतले होते.

२४ नोव्हेंबर २०२५ रोजी माझा मुलगा यश उर्फ विकास नगराळे हा रात्री ७/३० वाजताच्या सुमारास शेतात जागली करीता गेला होता. २५ नोव्हेंबरच्या सकाळी ८/०० वाजता घरी परत आला. त्यानंतर रात्री ९/३० वाजताच्या सुमारास शेतात जातो असे सांगुन तो पुन्हा शेतात गेला. त्यानंतर मी यश उर्फ विकास नगराळे यांस जेवन करण्याकरीता फोन केला असता, माझा मुलगा यश उर्फ विकास हा फोन उचलत नव्हता. त्यामुळे मी शेतात बोलावण्याकरीता गेली असता, माझा मुलगा यश नगराळे (वय १७) याने शेतात जागली करीता बांधण्यात आलेल्या अटाळीला नायलन दोराच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे दिसुन आले. मी त्यास खाली उतरवून आवाज दिला असता, मुलगा यश उर्फ विकास नगराळे हा मरण पावल्याचे दिसुन आला. मी घाबरून आरडाओरड केली. 

सदर घटनेची माहिती पारवा पोलीसांना मिळाल्याने मृतक यश उर्फ विकास याचे शवविच्छेदन करण्यासाठी पारवा पोलीस घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तसेच माझा मुलगा यश उर्फ विकास नगराळे हा घटनेच्या दिवशी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता नसरीन उर्फ नसीम पठाण सोबत फोनवर बोलत होता. त्यामुळे माझा मुलगा यश नगराळे हा नसरीन शब्बीर पठाण हिने मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे माझा मुलगा गळफास लावून आत्महत्या केली आहे, असा जबानी रिपोर्ट मृतकाची आई सतिका दत्ता नगराळे यांनी पारवा पोलीस स्टेशनला दाखल केल्याने नसरीन उर्फ नसीम शब्बीर पठाण विरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे व अँट्रोसिटी अँक्टचा गुन्हा पारवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी नसरीन उर्फ नसीम शब्बीर पठाण ही सद्या फरार असून पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक व पारवा पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. 

पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी राॅबिन बन्सल (ADDL DP & SDPO ROBIN BANSAL) हे आपल्या पोलीस पथकासह पुढील तपास करीत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos