महत्वाच्या बातम्या

 पुणे विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांची ६९ उड्डाणे रद्द, प्रवाशांना होतोय मोठा त्रास


- सातत्याने विमान सेवा प्रभावित, पुणे विमानतळ प्रशासनाची शर्थ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : पुण्याच्या लोहगाव विमानतळावर शनिवारी (६) दिवसभरात एकूण ३,५०९ प्रवाशांचे आगमन आणि ३ हजार ६५० प्रवाशांनी प्रस्थान केले. मात्र, यामध्ये सर्वात मोठा फटका इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवाशांना बसला आहे. ३४ विमानांचे आगमन आणि ३५ विमानांचे उड्डाण रद्द झाल्यामुळे ६९ उड्डाणे प्रभावित झाली आहेत, ज्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी असुविधा निर्माण झाली आहे.

दिवसभरात एकूण २२ विमानांचे आगमन आणि २५ विमानांचे उड्डाण झाले, परंतु इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांची सेवा अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. यामुळे पुणे विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या इंडिगोच्या विमान सेवेत सातत्याने व्यत्यय निर्माण होत आहे, आणि गेल्या चार दिवसांपासून ही समस्या कायम आहे.

पुणे विमानतळ प्रशासनाने इंडिगो एअरलाइन्सच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी आपले प्रयत्न चालू ठेवले आहेत. पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले, प्रवाशांना सुविधा देण्यासाठी आम्ही सतत इंडिगो एअरलाइन्ससोबत समन्वय साधत आहोत. परिस्थिती सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना केली जात आहेत.

दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवासी भाड्यावर मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे हवाई प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर आणि परवडणारा होईल.

उड्डाणे रद्द करणारी कंपन्यांची यादी -
इंडिगो : ३४/३५
एअर इंडिया : ०/०
स्पाइसजेट : ०/०
अकासा एअर : ०/०
फ्लाय ९१ : ०/०
स्टार एअर : ०/०

प्रवाशांच्या सुविधा आणि हवाई वाहतुकीतील विस्कळितता लक्षात घेता, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे की, प्रवासी भाड्याची मर्यादा लावून नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा पुरवली जाईल.





  Print






News - Rajy




Related Photos