पित्याचा धक्कादायक कृत्य : मुलीवर चाकूने वार, नंतर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न


- नागपूर : संशयाच्या किड्यामुळे मानकापूरमध्ये खळबळजनक घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : संशयाच्या शंकेने ग्रस्त झालेल्या एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीला चाकूने वार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. रक्ताने माखलेल्या मुलीला घरात सोडून आरोपी घराबाहेर पळाला, आणि कारवाईच्या भीतीपोटी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली, ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
रामप्रसाद तिवारी (५३), झेंडा चौक, मानकापूर, असे आरोपी पित्याचे नाव आहे. तो प्रॉपर्टी दलाल होता आणि त्याला पत्नी आणि तीन मुली आहेत. तिवारीच्या मोठ्या मुलीने बारावीत शिक्षण घेत असताना तिला त्याने शिक्षण बंद करण्यास भाग पाडले होते. त्याने सतत मुलीवर संशय घेतला आणि घरात वारंवार वाद निर्माण केले.
गुरुवारी दुपारी, तिवारीची पत्नी मंदिरात गेली होती, तर दोन लहान मुली शाळेत गेल्या होत्या. यावेळी तिवारीने त्याच्या मोठ्या मुलीवर अचानक वाद घालण्यास सुरुवात केली आणि संतापाच्या भरात तिला बेदम मारहाण केली. यानंतर त्याने तिच्यावर चाकूने वार केले. मुलगी रक्तबंबाळ झाली आणि तिवारी घाबरून घराबाहेर पळून गेला.
शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतली. तिवारी मानकापूर रेल्वे लाईन परिसरात गेला आणि मुलगी मरण पावली आहे असे समजून विष प्राशन केले. काही वेळातच तो बेशुद्ध पडला. त्याच्या तोंडातून फेस येत असल्यामुळे नागरिकांनी पोलिसांना कळवले. तिवारीला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दुसरीकडे, मुलीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती ठाणेदार हरीश काळसेकर यांनी दिली.
News - Nagpur




Petrol Price




