महत्वाच्या बातम्या

 वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या आदेशानुसार ब्रम्हपुरी परिसरातील नरभक्षक वाघ जेरबंद 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्‍हपूरी वन परिक्षेत्रातांतर्गत शेतात काम करत असताना शुक्रवार व शनिवारला दोन किलोमीटर परिसराच्‍या आत दोन महिलांचा वाघाने बळी घेतला. त्‍यामुळे नरभक्षक वाघाला जेरबंद करण्‍याचे आदेश राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्‍यानुसार तोरगांव बुज. परिसरामध्‍ये वनविभागाने रेस्‍क्‍यु ऑपरेशन राबवून नरभक्षक वाघाला जेरबंद केले. ३० व ३१ डिसेंबर २०२२ रोजी ब्रम्‍हपूरी वन परिक्षेत्राअंतर्गत शेतात काम करायला गेलेल्‍या सिता राम सलामे रा. तोरगांव बुज. (ता. ब्रम्‍हपूरी) तर ब्रम्‍हपूरी-नागभीड सिमेलगत असलेल्‍या टेकरीजवळ नर्मदा प्रकाश भोयर या महिलेस वाघाने ठार केले. त्‍यामुळे घटनेची माहिती मिळताच सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाला नरभक्षक वाघाला तात्‍काळ जेरबंद करण्‍याचे आदेश दिले. त्‍यानुसार १ जानेवारी २०२३ रोजी तोरगांव बुज. येथे नरभक्षक वाघाला वनविभागाद्वारे जेरबंद करण्‍यात आले. नरभक्षक वाघाला जेरबंद केल्‍याबद्दल माजी आमदार अतुल देशकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे व वनविभागाच्‍या अधिकारी तसेच कर्मचा-यांचे आभार मानले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos