औरंगाबादच्या भाविकांना घेता येणार चांदीच्या गणेश मूर्तीचे दर्शन , विदर्भातील खामगावात साकारली जात आहे ३१ किलो चांदीची गणेशमूर्ती


-  औरंगाबादच्या यादगार गणेश मंडळात होईल प्राणप्रतिष्ठा 
-  नागपूरच्या राजासाठी विश्वकर्माने बनविले ३ किलो सोन्याचे चरण 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बुलडाणा : 
एकेकाळी कापुसनगरी असलेल्या खामगावला शुद्ध  चांदीमुळे रजतनगरी अशी नवी तक जाती ओळख मिळाली असून येथील चांदीची चकाकी सातासमुद्रापार पहोचलेली आहे.  स्वतंत्र्यपूर्व काळापासून खामगाव शहर हे जगाच्या नकाशावर कापसाची बाजारपेठ म्हणन प्रसिध्द होते. याच काळापासून खामगाव शहरात चांदीचा उद्योग भरभराटीस आला. म्हणूनच खामगाव शहराला रजत नगरी म्हणून ओळखल्या जाते. या राजतनागरीत तयार होणारी ३१ किलो चांदीची गणपतींची मूर्ती यावर्षीचे गणेशोत्सवातील विशेष आकर्षण आहे. या मूर्तीची स्थापना औरंगाबादच्या यादगार गणेश मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.  
अनेक बड्या राजकीय नेत्यांना भेटवस्तू देताना येथील चांदीच्या वस्तुंना मागणी होते. यामध्ये सिनेसृष्टीतील अभिनेते अमिताभ बच्चन यांनी श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर मुंबई येथे अर्पण करण्यासाठी मूषकराजाची निर्मिती खामगाव येथे करवून घेतली होती. अभिनेता सुनील शेट्टी यांना भेटवस्तू स्वरुपात खामगाव येथील चांदीचा तबला देण्यात आला होता. तर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष असलेले शरद पवार यांना देण्यासाठी चांदीची बॅट, जिल्हा दौऱ्यावर असताना चांदीचा नांगर, घड्याळ अशा वस्तू येथून नेण्यात आलेल्या आहेत. शिवाय शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या मंदिरात चांदीची  सर्व कामे याच कारागिरांनी केले आहे. त्यामध्ये खामगाव येथील विश्वकर्मा सिल्वर हाऊसचे नाव संपूर्ण जगात नावारुप आले आहे.  स्व.जगदीशप्रसाद जांगीड यांनी स्थापन केलेल्या विश्वकर्मा सिल्वर हाऊसला १२५ वर्षे पूर्ण झाले आहेत. या विश्वकर्मा सिल्वर हाऊसमध्ये सध्या ३१ किलो चांदीची गणेशमूर्ती साकारत आहे. त्यासाठी तीन कारागिर दररोज १३ तास परिश्रम घेत आहे. ही भव्य ३१ किलो चांदीची गणेशमूर्ती औरंगाबाद येथील यादगार गणेश मंडळासाठी तयार करण्यात येत असून १२ ऑगस्ट रोजी गणेशमूर्ती तयार होऊन ते देणार आहेत.
तर नागपूरच्या एका प्रसिद्ध मंडळासाठी  सुमारे ३ किलोपेक्षाही जास्त वजनाचे सोन्याचे गणेश चरण देखील विश्वकर्मा सिल्वर हाऊसमध्ये तयार करुन पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  विविध देवी-देवतांच्या मुर्ती, हाऊसमधील कारागिर राजेंद्र मुखवटे , पूजेचे साहित्य, जीड, बादल व गणेश हरमकार  प्रभावळ, सिहासन, छत्र १३ तास परिश्रम घेवून मूर्तीला यासोबतच पानदान, डिनरसेट  आकार देण्यासाठी परिश्रम करीत अशा एक ना अनेक कलाकृती चांदीपासून बनविण्यात येत आहेत. गणेशोत्सवासाठी विविध मूर्ती, मुशकमोदक देखील चांदीचे बनविण्यात येतात.  Print


News - Rajy | Posted : 2018-09-11


Related Photos