कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये १ डिसेंबरपासून रात्रीच्या वेळेत संचारबंदी


-  नियमभंग केल्यास १ हजाराचा दंड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / चंदीगड :
पंजाबमध्ये सर्व निमशहरी भागात आणि मोठ्या शहरांमध्ये रात्रीच्या वेळेत संचारबंदी लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत. तसेच कोविडच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास १  हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दिल्लीत करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये करोनाची लाट येण्याची शक्यता लक्षात घेत सरकारने कडक पावलं उचलली आहेत.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आदेश देताना म्हटलं, “राज्यातील सर्व छोट्या आणि मोठ्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात येणार आहे. रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत हा कर्फ्यु असणार आहे.  तसेच कोविडच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची दंडात्मक रक्कम दुप्पट करण्यात आली असून ती १००० रुपये इतकी असेल. येत्या १ डिसेंबरपासून याची अंमलबजावणी करण्यात येईल.”
पंजाबमध्ये सर्व हॉटेल्स आणि रेस्तराँ रात्री साडेनऊ वाजेपर्यंत खुली राहतील. यानंतर १५ डिसेंबरपर्यंत करोनाच्या स्थितीची समिक्षा केली जाईल. दरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्यास सध्याच्या ५०० रुपयांचा दंड वाढवून दुप्पट अर्थात १००० रुपये करण्यात येणार आहे.
  Print


News - World | Posted : 2020-11-25


Related Photos