महत्वाच्या बातम्या

 निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज


- गडचिरोली विधानसभा क्षेत्र : कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी यांची भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. १२- गडचिरोली- चिमूर या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदार संघातील गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज झाले आहे. ५ व ६ एप्रिल रोजी ईव्हीएम यंत्र हाताळण्याच्या प्रात्यक्षिकासह मतदान प्रक्रिया संबंधीचे दुसरे प्रशिक्षण येथील शिवाजी महाविद्यालयात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी ६ एप्रिल रोजी प्रशिक्षणाला भेट देऊन मार्गदर्शन केले.त्यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी उपस्थित होते.

१२- चिमूर- गडचिरोली लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्र असून यात गडचिरोली, आरमोरी, अहेरी, आमगाव, ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. ६८- गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा व चामोर्शी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एकूण ३ लाख २ हजार २२८ मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या १ लाख ५२ हजार ६९३ तर स्त्री मतदारांची संख्या १ लाख ४९ हजार २९३ एवढी आहे. तृतीय पंथी २ मतदार, सेनादलातील २४० मतदार आहेत. या एकूण मतदारांमध्ये ८५ वर्षावरील मतदारांची संख्या ३ हजार २८ तर दिव्यांग मतदारांची संख्या २ हजार २५४ आहे.

 गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ३५६ मतदान केंद्र असून एकूण १ हजार ५७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेत नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी २८ ते ३० मार्च रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडले.प्रशिक्षणात कंट्रोल युनिट, बॅलटिंग युनिट व व्हीव्हीपॅट यंत्र हाताळण्याचे कौशल्य समजावून सांगण्यात आले. यावेळी मतदान प्रक्रियेतील मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष व इतर अधिकारी यांना नेमून दिलेले कामकाज, कर्तव्य व  जबाबदाऱ्यांची जाणीव प्रशिक्षणात करून देण्यात आली. संपूर्ण मतदान प्रक्रिये बाबत विस्तृत माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थींच्या मनात उपस्थित झालेल्या शंका व प्रश्नांचे निराकरण यावेळी करण्यात आले. प्रशिक्षण स्थळी प्रशिक्षणार्थींची मतदान प्रक्रिया संबंधीची परीक्षा घेण्यात आली.

प्रशिक्षण स्थळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह गडचिरोलीचे तहसीलदार हेमंत मोहरे, चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos