ड्रंक अँड ड्राइव्ह चे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार करणार दारुची डिलिव्हरी थेट घरी ?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
 ड्रंक अँड ड्राइव्ह चे प्रमाण कमी करण्यासाठी    राज्य सरकार आता एक असं धोरण राबवण्याच्या विचाराधीन आहे, ज्याअंतर्गत दारुची डिलिव्हरी थेट तुमच्या घरी होईल ! हे पाऊल उचलण्याचा सरकारचा मानस आहे. विशेष म्हणजे हे धोरण लागू करणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरणार आहे. महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान   ही माहिती दिली. 
चंद्रशेखर बावनकुळे  म्हणाले, 'दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे होणारे अपघात टाळणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. नशेत गाडी चालवून होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. यात अनेक जण मृत्युमुखी पडतात. जशा इ-कॉमर्स वेबसाइट असतात तशाच माध्यमातून जशी भाजी, फळे घरी येतात तशी दारूही घरपोच येईल.'  दारु ऑनलाइन मागवण्यासाठी वयाचा दाखला, ग्राहकांची आधार क्रमांकासह संपूर्ण माहिती घेऊन ओळख पटवली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. 
   Print


News - Rajy | Posted : 2018-10-14


Related Photos