महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही तालुक्यातील पाणी समस्या मिटणार : आ. विजय वडेट्टीवार


- सिंदेवाही तालुक्यातील ६० गावांना पाणीपुरवठा, योजनेअंतर्गत ५० कोटींच्या विकास कामांना मंजुरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : गेल्या वर्षानुवर्षांपासून भेडसावत असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील ग्रामखेड्यांची शुद्ध पेयजल समस्या कायमस्वरूपी मिटणार असून तालुक्यातील एकूण ६० गावांना राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून अंदाजे ५० कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी २५ गावांना नळ योजनेच्या कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाले आहे.

महाविकास आघाडी सरकार काळात सलग दोन वर्षे कोरोना या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जग हैरान झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापनाची सूत्र सांभाळणारे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार यांनी जीवाची परवा न करता राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली व कोरोना संकट टाळण्यासोबतच विकास कामांवर भरही दिला. अशाच विकासकामांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही तालुक्यातील एकूण ६० गावांना दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्य जपणे कठीण जात असल्याची समस्या वर्षानुवर्षांपासून भेडसावत होती. या गंभीर समस्येच्या निराकरणाकरिता माजी मंत्री वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन त्या ६० गावांना शुद्ध पेयजल मिळावे याकरिता विशेष पाठपुराव्यातून ५० कोटींचा निधीची मंजुरी मिळवून दिली. यापैकी चिखल मीनघरी १० लक्ष ६७.९९ लक्ष, इटोली १.४५, नलेश्वर ९३.१४ लक्ष, धुमनखेडा७०.४३ लक्ष, अंतरगाव ९७ लक्ष, चीटकी २४.५० लक्ष, मरेगाव चक ,मीनघरी ८८.९७ लक्ष, मोहबळी ३०.८७ लक्ष, पांढरवणी १० लक्ष, पेटगाव १.८७  कोटी, शिवनी १.८७ कोटी, वासेरा १.७९, कच्चेपार ८९.४ लक्ष कोटींच्या विकास कामांना मंजुरी सहकार्यारंभ आदेशाची प्राप्ती झाली आहे. तसेच उर्वरित ३५ गावांच्या विकास कामांना मंजुरी प्राप्त झाली असून लवकरच कामे सुरू होतील. राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दूरदृष्टीकोण व नागरिकांप्रती असलेली सद्भावना तसेच दीर्घ अनुभवातून मतदारसंघातील ग्राम खेड्यातील समस्या जाणून घेत शासन स्तरावर मंजूर करून घेतलेल्या सदर नळ योजना कामांमुळे हजारो नागरिकांच्या शुद्ध पेयजलाची समस्या कायमस्वरूपी मिटणार असून नागरिकांमध्ये याबाबत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos