महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


 २१ नोव्हेंबर महत्वाच्या घटना

१८७७ : थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.

१९११ : संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.

१९४२ : राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९५५ : संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.

१९६२ : भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.

१९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

१९७१ : भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.

१९७२ : दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.

२१ नोव्हेंबर जन्म

१६९४ : फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्तेर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १७७८)

१८९९ : ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८७)

१९१० : चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.

१९२६ : हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)

१९२७ : नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)

१९८७ : भारतीय बुद्धीबळपटू ईशा करवडे यांचा जन्म.

१९२४ : युगोस्लाव्हिया देशाचे ७वे पंतप्रधान मिल्का प्लानिंक यांचा जन्म (मृत्यू : ७ ऑक्टोबर २०१०)

१८४० : युनायटेड किंगडमची राजकुमारी रॉयल आणि जर्मन देशाचे सम्राज्ञी व्हिक्टोरिया यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट १९०१)

२१ नोव्हेंबर मृत्यू

१९०८ : देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.

१९६३ : प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९२)

१९७० : नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)

१९९६ : भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२६ – संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)

१९९७ : आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

२०१५ : भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३९)





  Print






Related Photos