महत्वाच्या बातम्या

 जिंकणे किंवा हरणे महत्वाचे नसून खेळ खेळणे महत्वाचे : उपविभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात आज २९  नोव्हेंबर रोजी सैनीकोत्सव २०२२ चे समारोप करण्यात आले. समारोपिय कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी हे होते, तर बक्षिस वितरक म्हणून गडचिरोली पोलीस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा हे होते. विशेष अतिथि म्हनुन गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल  क्रीडा अधिकारी बटकेलवार, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर हे प्रामुख्याने उपस्थित होते, तसेच गोंडवाना सैनिकी विद्यायालाचे उपमुख्याध्यपक ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, क्रीडा विभाग प्रमुख भूपेंद्र चौधरी, सैनिकी निदेशक ऋषी वंजारी व नामदेव प्रधान  हे होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला बलदेवता हनुमान यांच्या प्रतिमेला बक्षीस वितरक प्राणिल गिल्डा पोलीस उपविभागीय अधिकारी व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले. सर्व पाहुण्यांना विद्यालयातर्फे मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला.
प्रसंगी जिंकणे किंवा हरणे हे महत्वाचे नसून प्रामाणिकपने खेळ खेळणे हे मात्र महत्वाचे आहे असे मत गिल्डा यांनी दिले. पुढे बोलतांना त्यांनी क्रिकेट वीर विराट कोहली याचा उदाहरण दिला. जिद्द, मेहनत, शिस्त व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन हे ज्यांनी अंगी घेतले त्याचे जिंकणे हे ठरलेलं आहे. खेळ खेळतांना तो जिंकण्यासाठी कुठल्याही कूटनीतीचा वापर न करता तो जिंकला पाहिजे त्या खेळाला अत्यंत महत्व असते असे ते म्हणाले.
विद्यालयाच्या शिस्तीची त्यांनी स्तुती केली. जिंकलेल्या व स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्वच खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले .
या विद्यालयातील खेळाडू हा नेहमीच राज्यस्तरावरून बक्षीस प्राप्त करूनच येतो हि बाब गडचिरोली जिल्ह्याकरिता अत्यंत गौरवाची आहे असेच कर्तृत्व या विद्यालयाने करावे व आंतरराष्ट्रीय पातळीवर हि जिल्ह्याच्या झेंडा रोवावा असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस से जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल व विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी यांनीही यावेळी उपस्थित खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन केले.
सैनीकोत्सव दरम्यान चार दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धेत चारही हाऊसने हिर-हिरीने सहभाग नोंदविला होता, यामध्ये एकूण ८ सांघिक तर १० वयक्तिक खेळ खेळल्या गेले, सांघिक खेळामध्ये खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, हॅन्ड बॉल, बास्केट बॉल, रिले, परेड, कराटे हे सामने खेळल्या गेले तर वयक्तिक स्पर्धेमध्ये गोळा फेक थाळी फेक, चेस, रायफल शूटिंग, लांब उडी, उंच उडी, हॉर्स रायडींग, इत्यादी खेळ खेळल्या गेले. कब्बडी या सामन्यामध्ये अव्वल स्थान वीर सावरकर या हाऊस पटकाविला, संपूर्ण स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरक प्राणिल गिल्डा पोलीस उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन ढोले यांनी केले, प्रास्ताविक उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी केले, तर आभार शाहिद शेख यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos