महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली कराटेपटू शालेय विभागीय कराटे स्पर्धेत अव्वल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : नुकताच झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे नागपूर विभागीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा गोंदिया व चंद्रपूर मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात गडचिरोली कराटे क्लब, प्रशिक्षक योगेश चव्हाण, मिलिंद गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली मुली मध्ये कुमारी चेतना वाईकर, आरोही चव्हाण, प्रचिती नामदे, लावण्या कोवे, आचल वाकोडे, धनश्री राऊत मुलामध्ये आर्यन बावणे, सार्थक नेरकर, सार्थक गेडाम, मोहित मेश्राम, श्रीहश बुधबावरे, प्रथम कोरेत कुणाल, हिडामी, कुणाल, हीडामी, युवराज कटंगे या सर्व विद्यार्थ्यांची पुढील महिन्यात होणाऱ्या पुणे येथे शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धा करिता निवड झालेली आहे. आपल्या यशाचे श्रेय गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, क्रीडा मार्गदर्शक बडगेलवार, कराटे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वाघरे, उपाध्यक्ष रुपराज वाकोडे, शाळेतील क्रीडा प्रशिक्षक समस्त गडचिरोली वासियांना आई-वडिलांना गुरुजनांना दिले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos