अहमदाबाद शाळेत चाकूने हल्ला : विद्यार्थ्याचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अहमदाबाद : शहरातील खोखरा भागात मंगळवारी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. येथील एका खासगी शाळेत नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या नयन नावाच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी नयनवर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी त्याचा मृत्यू झाला.
नयन हा सिंधी समाजातील विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूनंतर संतप्त सिंधी समाजाच्या शेकडो लोकांनी शाळेसमोर जमाव करून निषेध व्यक्त केला. यानंतर काही हिंदू संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले. संतप्त जमावाने शाळेत प्रवेश करत तोडफोड केली, तसेच कर्मचाऱ्यांना मारहाणही करण्यात आली.
या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून अधिक कुमक मागवण्यात आली असून, नववीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर बाल न्याय कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.
दरम्यान, दोघांमध्ये मांसाहारावरून वाद झाल्याची माहिती समोर आली असून, आरोपी विद्यार्थी मुस्लिम समाजाचा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे घटनेला धार्मिक रंग चढण्याची चिन्हं आहेत. सिंधी समाजाने आरोपी विद्यार्थ्यासह शाळेचे मुख्याध्यापक व संचालकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
News - World




Petrol Price




