कुठे ? आहे का हो सुरक्षित जागा ! गोंधळलेल्या मानसिकतेचा आर्त टाहो...


आज मनुष्य विकृतीच्या जगात. मरण झाल सोप आणि जगण झाल कठीण कोठून येतो ही विकृती, समाजात सगळ्यात बुद्धिमान प्राणी वास्तव्याला असतो, व्यक्ती आपल्या बुद्धीच्या बळावर अशक्य ते शक्य करून दाखवितो, हे मात्र खर असल तरी तीच व्यक्ती आपल्या विकृतीमुळे होत्याच नव्हत करतो,  उद्धवस्त आणि बरबादी काय असते, याची प्रचीती  दाखवितो, पूर्वीही हीच माणसं होती, आपापल्या ऐपतीनुसार खान पिण होत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, एकट्या महिला बिनधास्त शेतीवाडीकड जावून काम करायच्या आलेला थकवा रात्रीच्या  निवांत झोपेमुळे निघून जायचा, दुसऱ्या दिवशी तेच आपल ताजेतवाने होवून रोजीरोटीसाठी बाहेर पडायच्या. आपल्या घरी असलेल्या पिल्याना भरवायच्या, आपल्या कुटुंबासोबत आनंदमयी जीवन जगायच्या, तेव्हा ना मोबाईल होता, ना टीव्ही होती, होता तो जिव्हाळा, आपुलकीचा ओलावा, मायेचा पाझर नात्यातील घट्ट वीण, हृदय – हृदयातील ओढ, पण आता इंटरनेटचा जमाना आला, मोबाईल आले, गाड्या आल्या, टीव्ही आली, इंटरनेट आला हे फार चांगल झाल यातून आपला विकास होतोय, एक सांगायचं एखाद निरोप द्यायचं म्हणजे पूर्वी एक व्यक्ती बघावं लागे. त्यासाठी कोणाची तरी हाजी – हाजी करत सायकल मागावी लागे. त्याला खर्चाला पैसे द्यावे लागे तेव्हा  कुठ हा गाडी निरोप देऊन यायचा, शिवाय गावातील माणसाला निरोप किवा आमंत्रण द्यायचं झाल तर पूर्वी हळद कुंकू लावलेले तांदूळ दर्शनी जागेत म्हणजे अगदी मोक्याच्या दरवाज्यावर ठेवून अमुकाच्या घरी जेवण पूजा आहे अस आमंत्रण असे. पण आता अॅनराइट मोबाईल आले, मित्र मैत्रिणीचे गट झाले एक निरोप टाकून दिला तरी एका क्षणात किती तरी लोकांपर्यंत पोहचतो हा फायदा झाला, रोज व्हिडीओ कॉलं करून जगाच्या पाठीवर कुठही असला तरी आपण जवळ असल्या सारखा बोलतो, हे तर अधिकच छान  झालय इंटरनेटने कमाल केली.दुसऱ्या बाजूने विचार केला तर यातून मायेचा पाझर, नात्यातील घट्ट वीण, आपुलकीचा ओलावा संपल, राहीले ते माणसं आणि माणसं,  या माणसाच्या जगात. माणसाची विकृती इतकी फोफाडली कि, त्या विकृतीने ५ महिण्याच्या मुली पासून तर ८० वर्षाच्या आजीबाई. या विकृतीच्या बळी पडत आहेत. इंटरनेच्या जमानेमुळे पूर्वी असलेल्या तल्लख बुद्धीमध्ये अधिकची भर पडली, या सगळ्या सुविधा मुळे नातेसंबध जागीच आटले, या पृथ्वी तलावरील  बुद्धिमान माणूस. आपल्या माणुसकीची सीमा पार करून आपल्या वासनेची भूक भागविण्यासाठी कोणत्याही टोकाची भूमिका घेताना दिसतोय आहे, म्हणून मला थोड लिहिताना भूमीकन्या बहिणा बाई चौधरी यांच्या कवितेतील संदर्भ द्यावं वाटतो आहे, “ अरे मानसा मानसा. कधी व्हसीन माणूस !  लोभासाठी झाला मानसाचा रे कानुस ! असा हा माणूस आपल्या वासनेची भूक भागविण्यासाठी सगळ विसरून जातोय,  कोणत्याही स्त्रीला आपल्या वासनेची बळी बनवितो, या माणसात चांगुल पण येत कुठून. आपली भूक भागली कि लगेच तिला जिवंत जाळून मारण, दगडाने ठेचून मारण आणि आपण केलेल्या दुष्कृत्याचा पुरावा नष्ट करणे, 

डॉ बाबसाहेब आंबेडकरानी संविधान लिहून सगळ्यांना अधिकार दिलय. त्या अधिकाराचा वापर करून लोक आनंदमयी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात पण समाजातीलच पापभिरू लोक वासनेच्या आहारी जाऊन महिलांचे लचके तोटायला टपून   आहेत, डॉ प्रियांका  रेड्डी काय दोष आणि गुन्हा होता, नेहमीचा रस्ता संकट म्हणून उभा राहिला, बुद्धिमान माणसं दानव म्हणून रस्ता अडविले, परिचारिकेचा काय दोष घरी जायला उशीर झाला याची संधी साधून.  गावाचा नात्यातील मामा कंस म्हणून उभा राहिला,  जळगावच्या लीलाबाई खरात अपंग महिला आपल्या घरी झोपून होत्या.त्यांचा स्वतःचा घर सुनसान स्मशानभूमी समजून.  शेजारच्या नराधमाने वासनेच्या आहारी जावून समुद्रासारखा रौद्ररूप धारण करून आपली  भूक भागवून राळेने कानाखाली मारून यमसदनी पाठविले,  अरेरे स्वतःच  घर सुरक्षित राहील नाही, स्वतःचे अधिकार स्वतःला वापरण्यास आम्हा महिलांना मुबा नाही, यावर कोणी सांगू शकेल काय महिलांसाठी सुरक्षित स्थळ? आज  महिला मुलींना आनंदाने जगायला त्याच प्रमाणे मोकळ श्वास घ्यायला मोकळीकता सुद्धा राहिली नाही.

  ✍️शब्दांकन
संगिता तुमडे मु,पो,ता कुरखेडा,जिल्हा गडचिरोली, 

आपल्या प्रतिक्रियासाठी मो. न. 7517759139 / 9404227714
  Print


News - Editorial | Posted : 2020-10-20


Related Photos