श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद अखेर कोर्टात


- मुथरा जिल्हा न्यायालयाने दाखल करून घेतली याचिका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मथुरा :
  रामजन्मभूमीचा वाद मिटल्यानंतर आता मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद अखेर कोर्टात गेला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेच्या मालकी हक्काचा हा वाद आहे. या आधी सिव्हिल कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती. त्याला मथुरा जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने जागेच्या मालकीबाबतची याचिका शुक्रवारी दाखल करून घेतली असे वृत्त ‘आज तक’ ने दिले आहे. या प्रकरणी कोर्टाने सुन्नी वक्फ बोर्ड आणि ईदगाह मशिद ट्रस्ट यांनाही नोटीस बजावली आहे.
याचिकेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीच्या 13.37 एकर जागेची मालकी मागण्यात आली असून शाही ईदगाह मशीद हटविण्याची मागणी केली आहे.
श्रीकृष्ण विराजमान सहीत 8 जणांनी याचिका दाखल केली आहे. या आधी भगवान कृष्ण विराजमान, कटरा केशव देव खेवाट, मथुरा बाजार शहर येथील जागेसाठी याचिकाकर्त्या रंजना अग्निहोत्री आणि इतर सहा भाविकांनी ही याचिका दाखल केली होती.
श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेवर मुघलकाळात कब्जा करण्यात आला होता. नंतर या जागेवर शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली होती. आता याच जागेवरील शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळली होती.




  Print






News - World | Posted : 2020-10-17






Related Photos