महत्वाच्या बातम्या

 २७ डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : शासन निर्णयान्वये २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, त्याअनुषंगाने २४ डिसेंबर २०२२ शनिवार हा शासकीय सुट्टीचा दिवस असल्यामुळे राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम २७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता गोंडवाना सभागृह, तहसिल कार्यालय परिसर गडचिरोली येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमामध्ये ग्राहक जनजागृती करण्याबाबत प्रर्दशन तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos