महत्वाच्या बातम्या

 पयडी-आलकनार पुलाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागात पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे धानोरा तालुक्यातील पयडी ते आलकनार रस्त्यावरील पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

नाबार्ड-३१ अंतर्गत या पुलासाठी ६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे या परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध होऊन शिक्षण, आरोग्यसेवा आणि शेतीविषयक कामांना मोठी मदत होणार आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष साजणजी गुंडावार, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, विजयजी कुमरे, जिल्हा महामंत्री डॉ. प्रकाशजी गेडाम, तालुका महामंत्री सुभाषजी धाईत, युवा नेते पवनजी येरमे, श्रीनिवासजी दुल्लमवार, नगरसेवक गटनेते संजयजी कुंडू, नगरसेवक मल्लिक बुधवानी, कालिदासजी लेंगगुरे, संतोषजी एक्का, अभिजितजी गाईन, कलिरामजी राऊत, युवा नेते अविनाशजी पोरेटी, प्रशांतजी राऊत, प्रशांत पेदापड्डीवार, गाव पाटील रमेशजी वालको, गाव पाटील दानचूजी तोफा,  तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुरुषोत्तम मेश्राम, अनामिका श्रोते, लक्ष्मणजी गणेलवार, अशोकजी लडके व परशुरामजी तुमडे यांची उपस्थिती होती.





  Print






Related Photos