कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


- शांतीनगर चौकातील घटना, अपघात नित्याचेच
विदर्भ न्युज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
  नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. यात  दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी ११ वाजताच्या  सुमारास शांतीनगर चौकात झाला. शांतीनगर चौकात अपघाताची मालिका सुरु असून  या चौकात गतीरोधक लावण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.  माधव ठाकरे (वय २४) रा. उमरी (मेघे) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कंटेनरचालकास अटक केली असून  रामनगर पोलिसांनी कंटेनर जप्त केला आहे.
माधव ठाकरे हा आपल्या घरी उमरी मेघे येथे जात असतानाच यवतमाळकडून नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या डब्लूबी.१५/बी.७३४९ क्रमांकाच्या कंटेनर ने माधव  चालवत असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. यात माधव ठाकरे याचा जागीच मृत्यू  झाला. माधव ठाकरे याचा चूलतभाऊ रामदास तरटे हा मृत माधवच्या मोबाईलवर फोन  करीत होता. पण माधवचा फोन लागत नसल्याने तो पुन्हा उमरी मेघे येथे घरी जाण्यास निघाला असता त्याला माधवचा अपघातात मृत्यू झाल्याचे दिसले. दरम्यान रामदास तरटे यांनी रामनगर पोलिस ठाण्याला अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी अपघातस्थळी जात मृतदेह  उत्तरिय तपासणीकरीता सावंगी रुग्णालयात पाठवला. तसेच पंचनामा करून  वंâटेनरचालक सुखदेव पंडित रा. बिहार यास ताब्यात घेतले. पुढील तपास  रामनगर पोलिस करीत आहे.
शांतीनगर चौकात दरदिवसाआड अपघातांचे सत्र सुरू असून चौकात गतिरोधकाअभावी  नाहक जीव जात आहेत. आधीच रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने वाहनांना  आवागमन करण्याकरीता त्रास सहन करावा लागत आहे. अपघातात जाणारे नाहक जीव  वाचविण्याकरीता शांतिनगर चौकात गतिरोधकाची निर्मिती करणे गरजेचे असल्याने  याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. 



  Print






News - Wardha | Posted : 2018-09-28






Related Photos