डोळ्यांवर घातक परिणाम करणाऱ्या लेझर लाईटवर प्रतिबंध


- नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू
- २८ ऑक्टोंबर पर्यंत प्रतिबंध आदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यामध्ये सार्वजनिक उत्सवांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर लेझर लाईटचा वापर केला जातो. या लाईटचा प्रकाश मानवी डोळ्यांसाठी घातक असून मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिक, भाविकांच्या डोळ्यावर याचा प्रकाश पडल्यास डोळ्यांच्या पडद्यावर तसेच बुबुळावर गंभीर इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे २८ ऑक्टोंबर पर्यंत या लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शांतता, कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी आगामी सण उत्सवाच्या कालावधीत २८ ऑक्टोंबर पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वान्मथी सी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ कलम लागू करुन लेझर लाईट वापरावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर आदेश जिल्ह्यात २९ सप्टेंबर ते २८ ऑक्टोंबर पर्यंत आगामी सार्वजनिक गणेशोत्सव हाडपक्या (मस्कऱ्या) गणपती, घटस्थापना, नवरात्रोत्सव, ग्यारवी शरीफ उर्स संदल तसेच इतर सर्वधर्मीय सण या कालावधीसाठी राहणार असून या कालावधीत लेझर लाईट, हाय पॉवर लेझर बीम, लेझर शो यांच्या वापरावर प्रतिबंध राहणार आहे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे आहे.




Petrol Price




