महत्वाच्या बातम्या

 शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


- राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १७ विद्यार्थी पात्र

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथील खेळाडू विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी १७ खेळाडू विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

१५ ते १७ डिसेंबर २०२२ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे झालेल्या विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळेतील २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी १७ विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात उत्तम कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये १४ वर्षे वयोगट मुले-आकाश महा-४०० मी. प्रथम, ६००मी. प्रथम, सुरज दुर्वा-४०० मी. द्वितीय, ६०० मी. द्वितीय, ईश्वर मोड्यामी, सुरज दुर्वा, दिपक दुर्वा, आकाश महा-४१००मी. रिले प्रथम. १४ वर्षे वयोगट मुली- रोशनी माडकामी-४००मी. द्वितीय, ६००मी. द्वितीय. बबिता काळंगा, सोनी वाचामी, रितीका मडावी, रोशनी माडकामी -४१०० मी. रिले प्रथम. १७ वर्षे वयोगट मुले-साईनाथ पुंगाटी-८०० मी. द्वितीय, १५००मी. द्वितीय सुकान विडपी-३००० मी. प्रथम, एकनाथ दुर्वा-५००० मी. प्रथम, महेंद्र मज्जी -भालाफेक प्रथम. १९वर्षे मुले-गणेश गोटा-८००मी. द्वितीय. १९ वर्षे वयोगट मुली-मुन्नी मडावी-८०० मी.द्वितीय, १५००मी. प्रथम, लक्ष्मी पुंगाटी-१५०० मी. द्वितीय, ३०००मी. द्वितीय, लाली उसेंडी, जमुना मज्जी, मुन्नी मडावी, लक्ष्मी पुंगाटी-४*४००मी. रिले प्रथम. यांचा समावेश आहे.

क्रीडा शिक्षक विवेक दुबे व सर्व प्राविण्य प्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांना सुप्रसिध्द समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ.सौ.मंदाकिनी आमटे, डॉ.दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, अनिकेत आमटे,समिक्षा आमटे,तसेच मुख्याध्यापक श्रीराम झोडे व शिक्षकांनी खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos