महत्वाच्या बातम्या

 तळोधी येथे ग्रामीण अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : वीर मराठा क्रिकेट क्लब, रामपुरी टोली यांच्या वतीने आयोजित ग्रामीण अंडरआर्म रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार डॉ. नरोटे यांनी तळोधी परिसरातील विविध विकासकामांची माहिती दिली. तळोधी येथे कुंभार समाज सभागृह आणि मच्छी मार्केट उभारण्याबाबत प्रयत्न सुरू असून, स्मशानभूमीचे काम जनसुविधा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यास मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृषी गोदामाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. क्रीडांगणासह परिसरातील इतर विकासकामांसाठीही आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, बूथ प्रमुख किशोर गटकोजवार, मोहन चिलंगे, जितेंद्र कुनघाडकर, निरज पेड्डीवार, अतुल सुर्जागडे, किशोर किरमे, अंकुश संतोषवार, प्रकाश वासेकर, श्रीधर मांदाळे, गणेश दुधबळे, हरिश माकडे, प्रशांत कोटगले, सतीश पेंदोरकर, अभिलाष कुनघाडकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.





  Print






Related Photos