‘अहेरी चा राजा’ च्या विसर्जन मिरवणूकीत पालकमंत्री ना. आत्राम यांनी ठेका धरून युवकांमध्ये जागविली स्फूर्ती


- गणपती बाप्पांचे थाटात विसर्जन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी : शहराची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी चा राजा गणेशाचे विसर्जन काल २२ सप्टेंबर रोजी उत्साहात करण्यात आले. यावेळी ढोल - ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत राज्याचे आदिवासी विकास तथा वनराज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरून नवयुवकांमध्ये स्फूर्ती जागविली.
राज्याच्या मंत्रीमंडळातील सर्वात तरूण मंत्री म्हणून ओळख असलेले ना. आत्राम गणेशोत्सवात अहेरी येथे दहा दिवस उत्साहात आणि मनोभावे पुजा अर्चा करतात. यावर्षी पालकमंत्री ना. आत्राम यांनी नागरिकांसोबत गणेशोत्सव उत्साहात साजरा केला. काल २२ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत त्यांनी युवकांसोबत नाचत बाप्पाला निरोप दिला. यावेळी ना. आत्राम यांचे नृत्यकौशल्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सर्वच जण पुढे सरसावत होते. अतिशय उत्साहाच्या वातावरणात श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले.
News - Gadchiroli | Posted : 2018-09-23