चांदाळा मार्गावर दुचाकी नाल्यात कोसळून वनरक्षक ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / गडचिरोली :
कर्तव्यावर जात असलेल्या वनरक्षकाचा दुचाकी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. सदर घटना आज ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चांदाळा मार्गावर घडली.
अशोक मोतीराम आत्राम (४२) रा. गोकुलनगर गडचिरोली असे मृतक वनरक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार अशोक आत्राम हे चातगाव वनपरीक्षेत्रात वनरक्षक पदावर कार्यरत होते. ते आपली दुचाकी क्र्रमांक एमएच ३३ इ २१४२ ने चांदाळा मार्गे जात होते. दम्यान त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी नाल्यात कोसळली. नाल्यामध्ये असलेल्या दगडावर दुचाकीसह अशोक आत्राम आदळले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. गडचिरोली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून प्रेत ताब्यात घेतले. जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-03


Related Photos