महत्वाच्या बातम्या

 कळमना येथे वंचित बहुजन आघाडीचा संविधान संवाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय संविधानाचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे, संविधानिक मूल्यांबाबत जनजागृती करणे आणि समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २६ ऑक्टोबर २०२६ रोजी बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे संविधान संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक समाजबांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संविधानाचे महत्त्व, सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि लोकशाही मूल्यांची जपणूक याविषयी मार्गदर्शन केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव समाजातील सर्व घटकांना होणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तसेच सामाजिक एकोपा मजबूत करण्यासाठी आणि संविधानिक विचारांचा प्रसार करण्यासाठी अशा संवाद कार्यक्रमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश तावाडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कविताताई गौरकर, जिल्हा उपाध्यक्ष दिव्यकुमार बोरकर, संघटक राकेश पेटकर, ज्येष्ठ सल्लागार दुरेश तेलंग, युवा आघाडीचे बल्लारपूर तालुकाध्यक्ष अभिलाष चुनारकर, बल्लारपूर तालुकाध्यक्ष संजय वाघाडे, बल्लारपूर शहर महासचिव गौतम रामटेके, बल्लारपूर तालुका महासचिव नितीन रायपुरे, कोठारी येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुरेश रंगारी, वंचित बहुजन आघाडीचे कोठारी येथील युवा नेते प्रमोद काटकर, कळमना येथील युवा नेते अमित नळे आणि वंचित बहुजन आघाडीचे सदस्य पुंजाराम जुमडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कळमना येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच समाजबांधव उपस्थित होते. संविधानिक विचारांचा प्रसार आणि सामाजिक जनजागृतीच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.





  Print






Related Photos